तभा वृत्तसेवा शिरपूर जैन, ३१ जानेवारी १७ सदस्यसंख्या असलेल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत ही अत्यंत महत्वाची आहे. या ग्रामपंचायतवर श्याम गाभणे व संजय शर्मा यांच्या गटाचे वर्चस्व असून, मागील दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे व ठरल्याप्रमाणे इंदू गजानन ईरतकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा १६ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला होता. ३१ जानेवारी रोजी ग्रामपंचातय सदस्यांची सभेत सर्वानुमते इंदू ईरतकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यानंतर सरपंच म्हणून संभाव्य उमेदवारांमध्ये शिवकन्या सारडा, खोरणे, दीपाली जाधव यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते, हे आता येणारा काळच सांगेल.
...अखेर शिरपूर सरपंचाचा राजीनामा मंजूर