दिल्लीतील तत्कालीन बिडला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ ला घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे महात्मा गाधाजाचा प्राणज्योत मालवली. गांधीजींनी संपूर्ण आयुष्य सत्याचे प्रयोग । राबविले. त्यातून त्यांचे आयुष्य हे उघडे पुस्तकच झाले. निसर्गरम्य असा बिडला हाऊस तेथे त्या काळी सर्व समुदयाचे लोक गांधीजींच्या प्रार्थनेला उपस्थित राहण्यासाठी आर्वजुन येत होते. ती परंपरा आज त्यांच्या हुतात्म्या दिनी आता नव्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गांधी स्मृति आणि दर्शन समिती येथे दिसली. भारताच्या राज्यघटनेमध्ये अभिप्रेत असलेली समता. स्वातंत्र्य बंधुता, न्याय हे तत्त्व सर्वच धर्मांमध्ये निहीत आहेत. आपल्या संविधानामध्ये स्त्री-पुरूष समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्वच धर्माचा आणि धर्मवलंबियाचा मान-सन्मान करण्याचे तत्त्व आपण अंगिकारले आहे. निसर्गाच्या कुशीत खुल्या आसमंतात गांधीजी पंचतत्वात विलीन झाले. त्याच ठिकाणी आजही हिरवळ आहे. इथल्या फुलाफुलात, पाना-पानात गांधीजींचे अस्तित्व जाणवते. गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी आयोजित कार्यक्रमात मेघालय, उत्तर प्रदेशातील नोयडा तसेच दिल्लीस्थित शाळेतील विद्याथ्यांनी पुष्प की अभिलाषा', ऐ मालिक तेरे बंदे हम....' जहा डाल डाल पर सोनेकी चिड़ीया करती है बसेरा.....' ये जीवन पावन करो.. हे पारसमनी.....', चरखा चला चलाकर लेंगे स्वराज्य लेंगे....' या गायनाने आपल्या प्रिय बापूंना श्रद्धा सुमन अर्पित केले. यानंतर बौब्द भन्ते, ख्रिश्चन, पारसी, बहाई, यहूदी, मुस्लीम, शिख, हिंदू धर्मगुरू, कबीराचे शब्द कीर्तनकार, एकाच ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येक धर्मगुरू पूर्जा अर्चा करतांना निस्वार्थ प्रेम करा, प्रेम केवळ आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर, आपल्या आवडत्या व्यक्तीवर नव्हे तर आपल्या वैऱ्यावरही प्रेम करण्याचा संदेश देत होते. प्रेमाचा संदेश हा सर्वदूर पसरवा, प्रेमाची अनुभूती, प्रेमाची स्पंदने तुमच्या वैऱ्यालाही तुमचा मित्र बनवेल असा आशावाद निर्माण करीत होते.
गांधीजींना अभिवादन दिल्लीतील